आमच्याबद्दल
संस्थापक
श्री.दिपक दत्तात्रय बंदरे
श्री विठ्ठल मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी
दूरदृष्टी विश्वास आणि समाजभान जपणारे नेतृत्व चेअरमन दिपक बंदरे
चेअरमन दिपक बंदरे हे नाव सामाजिक सांस्कृतिक सहकार बँकिंग संबंधित निगडित आहे.अशा विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने नवीन मोहोर उमटवलेले नवीन आश्वासक ग्लोबल नजर असलेले अभ्यासू आणि प्रामाणिक नेतृत्व आहे.समाज भान ठेवून योजना आखणारे आणि बेभान होऊन योजना राबवणारे म्हणून चेअरमन दिपक बंदरे यांचे कडे विश्वासाने पाहिले जाते.सांगोला सारख्या सुंदर वातावरणातच त्यांची विचार बैठक पक्की झाली. सुरुवातीचे दिवस हे फार सहज सोपे नव्हते.त्या खडतर काळात त्यांनी अतिशय उत्तम मित्र जोडले,उत्तम पुस्तके वाचली.समाज मनाचा अभ्यास केला त्यांनी त्यांची म्हणून एक संगती लावली आपण प्रयत्नवादी आहोत आपली भूमिका स्वच्छ आहे नी मी स्वतः बरोबरच इतरांचंही भलं पाहतो ही त्यांची कार्यशैली या अनाम तडफेने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा समृद्ध होत गेला.
स्थानिक पातळी व सहकार क्षेत्रात आदर्श व आधुनिक बँकिंग व्यवस्थापक प्रणाली श्री विठ्ठल मल्टीस्टेट ने महत्त्वाचे स्थान प्राप्त केले आहे.एकविसाव्या शतकातील जागतिकीकरण,उदारीकरण आणि खासगीकरणाच्या गतिमान प्रक्रियेमुळे निर्माण झालेल्या विविध प्रश्नांची सोडवणूक करून विकास घडवण्यासाठी सहकार क्षेत्रात चेअरमन दिपक बंदरे यांनी दिलेले योगदान प्रेरणादायी आहे.
सहकारातील शिस्त आणि विचार धारणेची बांधिलकी म्हणून काम करणारा अत्यंत व्यापक विधायक आणि सकारात्मक विचार करून आपल्यावर सोपवलेली जनकल्याणाची जबाबदारी पार पाडणाऱ्या मोजक्याच सहकार्य नेतृत्वात त्यांचा नामोल्लेख नि:संकोचपणे केला जातो.चेअरमन दिपक बंदरे यांनी श्री विठ्ठल मल्टीस्टेट बँकेच्या माध्यमातून मोठे सामाजिक काम उभे केले आहे.गरीब आणि मध्यमवर्ग यांना कायम छोटी-छोटी कर्ज देऊन आर्थिक समृद्ध करण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला आपल्या स्वकर्तृत्वावर बँकिंग क्षेत्रात यशस्वीतेकडे वाटचाल झालेली श्री विठ्ठल मल्टीस्टेट या संस्थेने चेअरमन दिपक बंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक क्षेत्रात एक चांगली घडी बसवली आहे.एकूण 25 शाखेद्वारे महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यात उत्कृष्ट आर्थिक व्यवहार आर्थिक सेवा बजावत आहे.
बँकांचे जाळे खेड्यापाड्यात विस्तारलेले आहे. ग्रामीण भागातील माणूस या बँकेशी जोडलेला असल्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम होण्यास तसेच सोलापूर जिल्ह्याच्या आर्थिक विकासात विठ्ठल मल्टीस्टेट चे महत्त्वाचे योगदान आहे.श्री विठ्ठल मल्टीस्टेट चेअरमन दिपक बंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्यांना आर्थिक आधार देण्याचे काम करत आहे.
बँकिंग क्षेत्रातील विविध समस्या सोडवण्यासाठी कोट्यावधी रुपयांची पुंजी जमवण्यात आली असून सर्व प्रश्न सोडवण्यासाठी एका छताखाली सर्वांना सर्व प्रकारची मदत देण्याचे काम करणार आहे.यामध्ये कोणत्याही बँकेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी तांत्रिक सहाय्यक मिळवून देण्यासाठी कोअर बँकिंग सुविधा उपलब्ध करून देणे आदि विविध मुद्द्यावर ही मल्टीस्टेट काम करेल.
श्री विठ्ठल मल्टीस्टेट ही फायनान्शियल क्षेत्रात व विश्वासाच्या जोरावर अतिशय चांगली सेवा पुरवत आहे. सोनेतारण कर्ज,महिला बचत गट कर्ज ,मॉर्गेज लोन तसेच सरकारी नोकरदार कर्ज योजना चालू आहे.12% वार्षिक व्याजदराने ठेवीवर आकर्षक व्याज देते तसेच 100 दिवसांसाठी 10% योजना व इच्छापूर्ती ठेव योजना मासिक ठेव योजना रिकरिंग साठी विविध आकर्षक योजना यांसाठी नावलौकिक आहे.तसेच एनईएफटी,आरटीजीएस,आयएमपीएस मोबाईल बँकिंग देणारी व प्रत्यक्षपणे सुरळीत सेवा देणाऱ्या जिल्ह्यातील एकमेव संस्था आहे.सभासदांमध्ये आपल्या व्यवहारातून विश्वास निर्माण करण्यात यशस्वी झालेली आहे प्रशिक्षित कर्मचारी वर्ग तत्पर सेवा या बाबतीत श्री विठ्ठल मल्टीस्टेट नावलौकिकास प्राप्त झाली आहे.नोकरी,सामाजिक कार्य,आरोग्य,शिक्षण संघटन प्रबोधन जनसंपर्क आदींच्या माध्यमातून चेअरमन दिपक बंदरे यांचा जीवनपट भरगच्च बनला आहे दिवसेंदिवस त्यांच्या कार्यात सहभागी होणाऱ्यांची संख्या लक्ष्णीयरित्या वाढते आहे.हीच तर त्यांच्या कामाचे पावती आहे बँकेच्या 25 शाखा विविध ठिकाणी कार्यरत असून संचालक व कर्मचारी वर्ग यांच्या एकजुटीमुळे बँक दिवसेंदिवस प्रगती करत आहे.ग्राहक व सदस्यांना उत्तम सेवा देण्यासाठी बँकांचे संचालकांनी कर्मचारी वर्ग कटिबंधात समर्पित भावनेने आज वरच्या सर्व संस्थापक संचालक व कर्मचारी वर्गाने कार्य केल्यामुळे बँकेने उल्लेखनीय प्रगती साधली आहे.
आर्थिक ताकद
आमचा दृष्टिकोन
श्री विठ्ठल मल्टीस्टेट को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड ही संस्था सदस्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी बचतीसाठी सवय जोपासण्यासाठी आणि सामाजिक विकासासाठी स्थापन करण्यात आली आहे.आमचा उद्देश केवळ आर्थिक व्यवहार करणे नसून,विश्वासार्ह सेवा ,सहकार्य आणि पारदर्शकतेच्या माध्यमातून प्रत्येक सदस्याच्या जीवनमान उंचावणे हा आहे.
वर्षानुवर्ष आम्ही आमच्या सदस्यांना आकर्षक बचत योजना,सोयीस्कर कर्ज सुविधा,सुरक्षित व्यवहार आणि वैयक्तिक तसेच सामाजिक प्रगतीसाठी आवश्यक मार्गदर्शक पुरवत आलो आहोत.आमच्या कामकाजाचे मूळ विश्वास, सेवा, सहकार्य आणि प्रगती या चार स्तंभांवर आधारित आहे
सर्व ग्राहकांच्या विशेषतः सामाजिक आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांच्या,वित्तीय सेवा क्षेत्रातील गरजा पूर्ण करण्यासाठी विश्वासार्ह आणि पसंतीचा भागीदार बनणे आणि त्याद्वारे ग्राहकांच्या जीवनमानाची गुणवत्ता,उत्पन्न निर्मितीचे मार्ग,आरोग्यसेवा आणि शिक्षण सुधारणे.
संस्थेची वैशिष्ट्ये
ठेवीमध्ये अल्प बचती पासून मासिक ठेव वार्षिक ठेव करिता ठेव व कालावधीनुसार दर साल दर शेकडा 5% पासून ते 12% पर्यंत ठेवीवर व्याज दिले जात आहे.
पुरस्कार आणि कामगिरी
बँकेच्या सर्वांगी विकासामुळे बँकेला अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले त्यापैकी काही आहे.
दैनंदिन दामाजी एक्सप्रेसच्या राज्यस्तरीय पुरस्कार
महाराष्ट्र बिझनेस अवॉर्ड